सलोख्याच्या वारकरी विचारांचे

देहूमध्ये दिसले अनोखे प्रतिबिंब

देहू : यारे यारे लहानथोर। याती भलती नारीनर।। असे संत तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगात म्हटले आहे. म्हणजेच वारकरी संप्रदायात भेदभावाला स्थान नाही. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचे विचार संतांनी सांगितले आहेत. याच विचारांचे प्रतिबिंब आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूमध्ये दिसत आहेत. पंढरीला जाणाऱ्या संत तुकोबारायांच्या चांदीच्या रथाला झळाळी देण्याचे काम सध्या मुस्लीम कारागीर करत आहेत.
nike air max 90 sale
nike air max 90
new nike air max
nike air max sale
nike air max sc
nike air max cb 94 release dates 2023
nike air max sale outlet
nike air max 1
nike air max plus
nike air max sale mens
mens nike air max 90 sale
nike air max excee women’s
nike air max sale outlet
nike air max 97
nike air max 270
nike air max plus black
cheap nike air max shoes
nike air max 97
nike air max 270 women’s sale
mens nike air max
nike air max 270 mens
nike air max 270 sale
nike air max 97 womens sale
nike air max mens shoes
cheap nike air max
all nike air max shoes
nike air maxes 97
cheap nike air max shoes
nike air max sale mens
nike air max 270 womens
nike air max 90 womens for sale
best nike air max shoes
nike air max 270 kids
mens nike air max 90 sale
nike air max 95
nike air max 90
nike air max 270 women’s sale
nike air max 270 womens
nike air max black and white
nike air max 97 mens
womens nike air max 270

दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशा काही घटना राज्यामध्ये घडत असताना, परस्परांमध्ये विश्वास, प्रेम, बंधुभावाची भावना पंढरीची वारी निर्माण करते. याच भावनेने मुस्लीम कारागीर सध्या तुकोबारायांच्या चांदीच्या रथाला पॉलीश करत आहेत. वारीच्या वाटेवर अशी सलोख्याची अनेक उदाहरणे दिसतात. त्याची सुरुवातच जणू देहूमधून होते. पालखी सोहळ्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने अतिशय जलद गतीने कामे करण्यात येत आहेत. तुकोबारायांची चांदीची पालखी, चांदीचा रथ आणि पूजेसाठी लागणाऱ्या चांदीच्या साहित्यांना झळाळी (चांदीचा मुलामा) देण्याची सेवा पिंपरी गाव येथील प्रसिद्ध घनश्‍याम गोल्ड यांच्या वतीने सोमवारी (दि. ५) रात्री उशीरापर्यंत पूर्ण करण्यात आली.

घनश्‍याम गोल्डचे कुशल वर्मा यांच्या देखरेखी मध्ये त्यांच्या पाच मुस्लीम कारागिरांनी धार्मिक साहित्य पालखी रथ आणि पालखीला झळाळी देण्याचे काम केले. कमर महमद हुसेन आत्तार, इस्माइल युसुब आत्तार, महमद हूसेन युसुब आत्तार, शहाजान जब्बार आत्तार आणि उमर महमद हुसेन आत्तार अशी या मुस्लीम कारागिरांची नावे आहेत.

श्री संत तुकाराम महाराजांचा चांदीचा रथ, पालखी, मुखवटा, पादुका, गरूडटके, अब्दागिरी, चोपदार दंड, पाट, पूजेचे ताट, पळी, पात्र, पंचाआरती, समई, छत्री, चांदीची आभूषणे तसेच श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदीरातील महिरप, मेघडंबरी, शेषनाग, मखर, चौकट, दरवाजे आदींना चांदीची झळाळी देण्यात आली. ही झळाळी देण्यासाठी चिंचेचे पाणी, लिंबू, रिठा, वॉशिंग पावडर, लोखंडी तारांचा ब्रश आदींचा वापर करण्यात आला.

यातील एक कारागीर उमर अख्तार म्हणाले की, गेल्या सात वर्षांपासून संत तुकोबांच्या पालखी रथाला चकाकी देण्याचे काम मी करत आहे. यामुळे एक वेगळाच आनंद मिळतो. आम्हाला हे काम करायला आवडते. आम्ही हिंदू-मुस्लिम भेद करत नाही. या कामातून आम्ही एकतेचा संदेश देत आहोत.

संत तुकाराम महाराजांच्या या ६ बाय १३ फूट आकाराचा पालखी रथ सुमारे ५०० किलो चांदीचा वापरून तयार करण्यात आला आहे. दरवर्षी वारीच्या आधी या रथाची डागडुजी करण्यात येते आणि रथाला पॉलिश करण्यात येते. सुरक्षेच्या दृष्टीनं या रथाला सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणाही बसवण्यात आली आहे. वारीच्या काळात सुमारे २३ दिवस या रथाला सुंदर फुलांनी सजविले जाते. त्यासाठी दररोज २०० किलो फुले लागतात. पाच कारागीर रोज आठ तास यासाठी राबत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *