गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शुभवार्ता
आळंदी : कोरोनामुळे गेली दोन वर्षे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीच्या स्पर्श दर्शनापासून वारकरी, भाविक दुरावले होते. मात्र गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर अर्थात आजपासून (दि. २ एप्रिल) माऊलींच्या संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन सुरू झाले आहे.
सकाळी ६ वाजल्यापासूनच श्री ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन सुरू झाल्याने भाविक, वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क घालूनच वावरावे, शक्यतो मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहनही संस्थानकडून करण्यात आले आहे.
गुढी पाडव्यादिवशीचे मंदिरातील कार्यक्रम –
पहाटे ३.३० वाजता : घंटानाद
पहाटे ३.३० ते ३.४५ : काकडा आरती
पहाटे ४.०० ते ५.३० : पवमानपूजा, दुधारती, गुढीपूजा
पहाटे ५.३० ते दुपारी १२.०० भाविकांना ‘श्रीं’च्या चलपादुकांवर अभिषेक/महापूजा
सकाळी ६.०० ते ७.०० : पंचाग पूजन
सकाळी ७.०० ते ८.०० : प्रवचन : स्थळ – साधकाश्रम
दुपारी १२.०० ते १२.३० : ‘श्रीं’ना महानैवद्य
दुपारी १२.३० ते २.०० : भाविकांना ‘श्रीं’चे स्पर्श दर्शन
दुपारी २.०० ते सायंकाळी ६.०० : ‘श्रीं’ना चंदनउटीद्वारे श्री गणेश अवतार. भाविकांना संजीवन समाधीचे दर्शन बंद.
दुपारी : २.०० ते सायंकाळी ६.०० : भाविकांना ‘श्रीं’च्या चलपादुकांचे दर्शन (कारंजा मंडप)
सायंकाळी ४.०० ते ६.०० : कीर्तन – वै. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था – वीणामंडप
रात्री ८.०० ते ८.३० : ‘श्रीं’ची धुपारती
रात्री ८.३० ते ११.३० भाविकांना ‘श्रीं’च्या गणेश अवताराचे मुखदर्शन – पंखामंडप
रात्री ११.३० ते १२.०० : ‘श्रीं’ची शेजआरती (त्यानंतर मंदिर बंद)