माऊलींच्या पालखीसोबतच्या हजारो
वारकऱ्यांची एकादशीने घेतली परीक्षा
पुणे : डोक्यावर तळपणारे टळटळीत ऊन, अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा आणि दमछाक करणारी दिवे घाटाची चढण… अशी आजच्या योगिनी एकादशीने जणू संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सोबत पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांची परीक्षाच घेतली. या परिस्थितीतही अत्यंत उत्साहात आणि आनंदात ‘माऊली माऊली’च्या गजरात पालखी सोहळ्याने घाट ओलांडला आणि रात्री सव्वा नऊ वाजता पालखी सासवड मुक्कामी दाखल झाली.
cheap wig
wig store
wigs on sale
wig stores
best wigs on amazon
wigs for black women
cheap wigs near me
best wigs online
best wigs
human hair wigs
best wigs for white women
best wigs
best wig outlet
cheap human hair lace front wigs
cheap human hair wigs
best wigs for black women
Full Lace Wigs
wigs for sale
wigs for sale
best wig outlet
cheap wigs
Lace Front Wigs
best wig outlet
human hair wigs
best wig outlet
wig outlet
cheap human hair lace front wigs
glueless wigs human hair
wigs sale
wig shop
colored lace front wigs
wig shop
best human hair wigs online
wigs on sale
wholesale wigs
real hair wigs near me
cheap wigs
black human hair wigs
best wigs for white women
wigs for sale online
best wigs
पुणेकरांचा पाहुणचार घेऊन आज भल्या सकाळीच संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी सासवड मुक्कामी, तर संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळीभोर मुक्कामाकडे मार्गस्थ झाली. माऊलींची पालखी पुण्यात भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे दोन दिवस मुक्कामी होती, तर तुकोबारायांची पालखी नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिरात मुक्कामी होती. या दोन दिवसांत हजारो पुणेकरांनी या दोन्ही संतांच्या पालख्यांच्या दर्शनासाठी गर्दी केली. तसेच आज सकाळी पालख्यांना निरोप देण्यासाठी पुणेकर हडपसर, दिवेघाटापर्यंत आले.
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठ, रामोशी गेट, भवानी माता मंदिर, लष्कर भागातील मुक्ती फौज चौक, पूलगेट पोलीस चौकी, मम्मादेवी चौक, सोलापूर रस्ता, हडपसर गाडीतळ येथून सासवडकडे मार्गस्थ झाली. तर, संत तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील अरुणा चौक, समाधान चौक, पिंपरी चौक, एडी कॅम्प चौक, रामोशी गेट, भवानी माता मंदिर, मुक्ती फौज चौक, पूलगेट पोलीस चौकी, मम्मादेवी चौक, सोलापूर रस्ता, हडपसर गाडीतळ येथून सरळ सोलापूर रस्त्याने लोणी काळभोरकडे मार्गस्थ झाली.
हडपसरमध्ये पालख्यांचे उत्साही स्वागत करण्यात आले. खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे पाटील, नगरसेवक योगेश बाप्पू ससाणे, शीतल संजय शिंदे आदी मान्यवरांनी पालख्यांचे दर्शन घेतले. माऊलींच्या पालखीचा सकाळचा शिंदे छत्री इथला विसावा आणि आरती झाल्यानंतर पालखी दुपारी हडपसर मार्गे दिवेघाटात आली. तत्पूर्वी तुकाराम महाराजांची पालखी हडपसर मार्गे लोणीकाळभोरला मार्गस्थ झाली.
बहुदा दरवर्षी दिवेघाटात माऊलींच्या पालखी सोहळ्यावर पावसाचा शिडकावा होतो. मान्सूनचे ढग आभाळात येऊन त्या सावलीत वारकऱ्यांची वाटचाल होते. पण, यंदा मान्सून लांबला आहे. त्यामुळे डोक्यावर आग ओकणारा सूर्य आणि अंगातून घामाच्या धारा, अशा स्थितीत वारकऱ्यांनी घाट चढण्यास सुरुवात केली. त्यात आज योगिनी एकादशीचा उपवास. म्हणजे जणू घाटाने आज वारकऱ्यांची परीक्षाच पाहिली.
परंतु आपल्या सोबत पालखीमध्ये प्रत्यक्ष माऊली आहे या भावनेने ‘माऊली माऊली’चा गजर करत वारकऱ्यांनी उत्साहाने घाट पार केला. अनेकांनी घाट रस्त्यात उत्स्फूर्तपणे टाळ-मृदंगांच्या तालावर फुगड्यांचा फेर धरला. पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले होते. सामाजिक संस्था, मंडळे, राजकीय व्यक्ती, खासगी कार्यालयांतर्फे वारकऱ्यांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात येत होते.
संध्याकाळी पालखी सोहळा सासवडमध्ये पोहोचताच सासवडकरांनी उत्साहाने वारकऱ्यांचे स्वागत केले. आज आणि उद्या (दि. १५) असा पालखी सोहळ्याचा सासवडमध्ये दोन दिवस मुक्काम असणार आहे. शुक्रवारी (दि. १६) भल्या सकाळी सोहळा जेजुरी मुक्कामाकडे मार्गस्थ होईल. तर आज लोणी काळभोरमध्ये मुक्काम करून तुकोबारायांचा पालखी सोहळा उद्याच (दि. १५) यवत मुक्कामी पोहोचेल.