व्यापारातील मित्र आणि टाळकरी गवरशेठ वाणी
संत तुकाराम महाराज आणि त्यांचे नंतर टाळकरी बनलेले संत गवरशेठ वाणी हे बालपणीचे मित्र. दोघेही व्यापारी होते. त्यांची व्यापारात भागीदारी होती. ते प्रामुख्याने मिरच्यांचा व्यापार करत. अंतकाळी उपस्थित राहण्याचे वचन गवरशेठ यांनी तुकोबारायांकडून घेतले होते. तुकोबांनीही ते वचन दिले आणि पाळलेही.
– ह. भ. प. संताजी महाराज गाडे-पाटील