विरोध करून नंतर भजनी लागलेला टाळकरी
लोहगावातील भांड्यांचे मोठे व्यापारी असणारे सधन शिवबा कासार सुरुवातीला कीर्तन, भजनात येत नसत. एकदा त्यांनी तुकोबारायांचे कीर्तन ऐकले आणि त्यांचे मनपरिवर्तन झाले. ते तुकोबांचे टाळकरी बनले. तुकोबारायांच्या सांगण्यावरून त्यांनी आपल्या संपत्तीचा जनकल्याणासाठी दानधर्म केला. त्यातूनच त्यांनी लोहगावात विहीर बांधली. ही विहीर अद्यापही आपणाला तेथे पाहायला मिळते.