माऊलींच्या पालखीच्या वाटेवरील
महत्त्वाच्या टप्प्यांवरील भावपूर्ण गाणी
पुणे : पंढरीच्या वाटेवर असलेले महत्त्वाचे टप्पे वारकऱ्यांच्या मर्मबंधातील ठेवी आहेत. या टप्प्यांची भावपूर्ण गाणी यंदाच्या वारीच्या निमित्ताने श्रिया क्रिएशन प्रस्तुत ‘कैवल्य वारी’ या अल्बमने आणली आहेत.
या गाण्यांच्या गीतकार आहेत, वर्षा राजेंद्र हुंजे. गाण्यांना संगीत दिलं आहे, पंडीत कल्याणजी गायकवाड यांनी. संगीत संयोजक आहेत, कमलेश भडकमकर. तर गायक आहेत, पं. सुरेश वाडकर, पं. शौनक अभिषेकी, पं. आनंद भाटे, अवधूत गांधी, विलास कुलकर्णी, कार्तिकी गायकवाड, शमिका भिडे, सावली भट्ट.
‘कैवल्य वारी’ या अल्बमचे प्रकाशन नुकतेच पुण्यात पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, ज्येष्ठ नेते उल्हास दादा पवार यांच्या हस्ते झाले.
यावेळी कैवल्य वारीचे सर्व गायक आणि टीम उपस्थित होती.
यानिमित्ताने ‘कैवल्य वारी’च्या टीमसोबत मारलेल्या या गप्पा…
सहभाग : संगीतकार कल्याणजी गायकवाड, गायिका कार्तिकी गायकवाड, शमिका भिडे, गीतकार वर्षा हुंजे, आणि
||ज्ञानबातुकाराम||चे संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड…
(कृपया, आमचं चॅनेल सबस्क्राईब करा)