हैबतबाबांच्या पायरीपूजनाने

सोहळ्याला आळंदीत प्रारंभ

आळंदी : माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे जनक गुरुवर्य हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२६ व्या संजीवन समाधी सोहळ्याची सुरुवात आज (दि. १७ नोव्हेंबर) सकाळी सात वाजता येथे झाली.

हैबतराव बाबांच्या वंशजांच्या हस्ते पायरीचे पूजन झाले. यावेळी मंदिर समितीचे मुख्य विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त ऍड. विकास ढगे आदी उपस्थित होते. आज दिवसभरात म्हणजे कार्तिक वद्य अष्टमीला. दुपारी १२.३० वाजता महानैवेद्य, सायंकाळी ६.३० ते ८ दरम्यान योगिराज ठाकूर यांच्या वतीने वीणा मंडपात कीर्तन आणि नंतर ९ ते ११ च्या दरम्यान बाबासाहेब आजरेकर यांच्या वतीने कीर्तन होणार आहे. रात्री ९ ते १२ श्रींची मंदिरात पालखी प्रदक्षिणा होईल. रात्री १२ ते १२.३० धुपारती, १० ते १२ वासकर महाराज यांच्या वतीने हैबतबाबांच्या पायरीपुढे जागर, १२ ते २ मारुतीबुवा कराडकर यांच्या वतीने जागर, २ ते ४ दरम्यान हैबतबाबा आरफळकर यांच्या वतीने जागर होणार आहे.

दरम्यान, कार्तिकी वारीसाठी आळंदीत हजारो वारकरी, भाविक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. या वारीसाठी लाखो वारकरी दिंड्या घेऊन आळंदीच्या वाटेवर आहेत. पंढरपूरहून निघालेल्या संत नामदेव महाराज यांच्या पालखीचे बुधवारी (दि. १६) सायंकाळी सात वाजता आळंदीत आगमन झाले. आज (दि. १७) श्री पांडुरंगरायाच्या पालखीचे आळंदीत आगमन होत आहे. दर्शनबारीत भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. भाविकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा, आरोग्य, स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

माऊलींचा हा संजीवन समाधी सोहळा २३ नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. या सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
कार्तिक वद्य नवमी शुक्रवार (दि. १८) पहाटे ४ ते ५ पवमान अभिषेक व दुधारती. सकाळी ५ ते ११.३० भाविकांच्या महापूजा. दुपारी १२.३० ते १ महानैवेद्य. सायंकाळी ६.३० ते ८.३० बाबासाहेब देहूकर यांच्या वतीने वीणा मंडपात कीर्तन. रात्री ८.३० ते ९ धुपारती. रात्री ९.३० ते ११ वासकर महाराज यांच्याव तीने वीणा मंडपात कीर्तन.

कार्तिक वद्य दशमी शनिवार (दि. १९) पहाटे ३ ते ५ पवमान अभिषेक व महापूजा. सकाळी ५ ते ११.३० भाविकांच्या महापूजा. दुपारी १२.३० ते १ महानैवेद्य. दुपारी ४.३० ते ६.३० गंगुकाका शिरवळकर यांच्या वतीने वीणा मंडपात कीर्तन. सायंकाळी ६.३० ते ८.३० धोंडोपंत दादा अत्रे यांच्या वतीने कीर्तन. रात्री ८.३० ते ९ धुपारती. रात्री ९ ते ११ वासकर महाराज यांच्या वतीने कीर्तन. रात्री ११.३० ते १२.३० वाल्हेकर महाराज यांच्या वतीने जागर.

कार्तिक वद्य एकादशी रविवार (दि. २०) रात्री १२ ते पहाटे २ वेळेत ११ ब्रह्मवृंदाच्या वेदघोषात पवमान अभिषेक व दुधारती. दुपारी १२ ते १२.३० महानैवेद्य. दुपारी १ वाजता श्रींची नगरप्रदक्षिणा. रात्री ८.३० धुपारती. रात्री १२ ते २ मोझे यांच्या वतीने जागर.

कार्तिक वद्य द्वादशी सोमवार (दि. २१) पहाटे २ ते ३.३० पवमान अभिषेक व दुधारती. पहाटे ३.३० ते ४ खेड तालुका प्रांत यांच्या हस्ते पंचोपचार पूजा. पहाटे ३ ते ६ नांदेडकर मंडळींची दिंडी क्रमांक १५ यांच्या वतीने मुक्ताई मंडपात काकडा भजन. सकाळी ५ ते ११.३० भाविकांच्या महापूजा. दुपारी १२.३० ते १ महानैवेद्य. दुपारी ४ ते सायंकाळी ७ रथोत्सव. दुपारी ४ ते ६ हरिभाऊ बडवे यांच्या वतीने वीणा मंडपात कीर्तन. रात्री ८.३० पालखीचे मंदिरात आगमनानंतर धूपारती. रात्री ९ ते ११ केंदूरकर महाराज यांच्या वतीने कीर्तन. रात्री ११ ते १२ श्रींचे गाभाऱ्यात पास धारकांसाठी खिरापत पूजा, प्रसाद वाटप. फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप.

कार्तिक वद्य त्रयोदशी मंगळवार (दि. २२) पहाटे ३ ते ४ या वेळेत माऊली देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त यांच्या हस्ते पवमान अभिषेक व दुधारती. सकाळी ५ ते ९.३० भाविकांच्या महापूजा. सकाळी ७ ते ९ हैबतबाबा आरफळकर यांच्या वतीने हैबतबाबा पायरीपुढे कीर्तन. सकाळी ७.३० ते ९.३० वीणा मंडपात कीर्तन. सकाळी ७ ते ९ दाणेवाले निकम दिंडी यांच्या वतीने भोजलिंगकाका मंडपात कीर्तन. सकाळी ९ ते ११ तेथेच कीर्तन. सकाळी १० ते दुपारी १२ नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन. सकाळी ९ ते १० महाद्वारकाल्याच्या कीर्तनानंतर हैबतबाबा दिंडीची समाधी मंदिरात प्रदक्षिणा. दुपारी १२ ते १२.३० दरम्यान माऊलींच्या ७२६ व्या संजीवन समाधी दिनानिमित्ताने घंटानाद, पुष्पवृष्टी, आरती आणि मान्यवरांना नारळप्रसाद. दुपारी १२.३० ते १ महानैवेद्य. सायंकाळी ६.३० ते ८.३० सोपानकाका देहूकर यांच्यावतीने कीर्तन. रात्री ९.३० ते ११.३० हरिभाऊ बागडे यांच्या वतीने कारंजा मंडपात भजन. रात्री ११.३० ते १२ धूपारती. रात्री १२ ते ४ हैबतबाबा आरफळकर यांच्या वतीने जागर.

कार्तिक वद्य चतुर्दशीसह अमावस्या बुधवार (दि. २३) पहाटे ३ ते ५ पवमान अभिषेक व दुधारती. सकाळी ५ ते ११.३० भाविकांच्या महापूजा. दुपारी १२.३० ते १ महानैवेद्य. दुपारी ४ ते ६ मोझे यांच्या वतीने कीर्तन. रात्री ८ ते ८.३० धुपारती. रात्री ९.३० ते १३.३० श्रींचा छबीना. रात्री १२.३० वाजता शेजारती होईल. सोहळ्याच्या कार्यक्रमाची सांगता फटाक्यांची आतषबाजी आणि पालखी छबिना मिरवणुकीने होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *