चिखली येथील टाळकरी मल्हारपंत कुलकर्णी
तुकोबारायांच्या १४ टाळकऱ्यांपैकी एक असलेले मल्हारपंत कुलकर्णी देहूजवळच्या चिखली या गावचे. वैकुंठाला जाताना तुकाराम महाराजांनी मल्हारपंतांना टाळ, घोंगडी आणि १२ अभंगांचा प्रसाद दिला. त्यामुळे गावाला ‘टाळगाव’ नाव पडले. तुकोबांच्या त्या दगडी टाळांवर गावामध्ये मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरात मल्हारपंतांची समाधीही आहे.