सर्व संतांच्या पालख्या वाहणाऱ्या

खिल्लार बैलांचा अनोखा सन्मान

पुणे : समता, बंधुभावाचा संदेश सांगत संतांच्या पालख्या घेऊन वारकरी नित्यनेमाने पंढरीच्या वारीला जातात. या संतांच्या पालख्या वर्षानुवर्षे आपल्या खांद्यांवर वाहून नेतात, शेतकऱ्यांचे खिल्लार बैल! यंदा ‘खिल्लार वारी’ ही मोहीम राबवत या बैलांचा अनोखा सन्मान ‘फेसबुक दिंडी’ करत आहे.

शेतात राबणा
nike air max 97 womens
mens nike air max 90 sale
mens nike air max
new nike air max 2023
nike air max 98
nike air max sale mens
nike air max women
nike air max for sale womens
nike air max cb 94 release dates 2023
nike air max 97 white
nike air max for sale
nike air max sc men’s
nike air max terrascape 90 rattan
nike air max white
new nike air max 2023
nike air max women
nike air max for sale
nike air max kids
womens nike air max 270
nike air max 270
nike air max 270 womens
nike air max shoe
nike air maxes
nike air max 97 white
nike air max sc
nike air max womens
nike air max sc leather
cheap nike air max shoes
nike air max 270 womens sale
nike air max terrascape 90 on feet
nike air max 270
nike air max 270 mens sale
nike air max 90 sale
nike air max new
nike air max 97
new nike air max
mens nike air max 90 sale
nike air max plus
nike air max 90 futura
new nike air max
nike air max 90 womensरा शेतकरी पहिल्या पावसानंतर पेरणी करून वारकरी होतो आणि पंढरीची वाट चालू लागतो. शेतात त्याला सोबत देणारी सर्जा-राजाची खिल्लार बैलांची जोडी वाटेवरही त्याला सोबत देते. ही जोडी संतांच्या पालख्यांची भोई बनलेली असते. अर्थात संतांची पालखी ठेवलेला रथ हे बैल ओढून नेत असतात. अगदी प्रस्थानाच्या गावापासून ते पंढरपूरला दर्शन घेऊन परतीच्या संपूर्ण प्रवासात हे बैल संतांच्या पालखीचा भार आपल्या खांद्यावर घेऊन वारी पूर्ण करतात.

संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी १६८५मध्ये देहू ते पंढरपूर असा पायी पालखी सोहळा सुरू केला. त्यांनीच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेऊन ही पालखी पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली. नंतर ही पालखी रथात ठेवण्यात आली आणि हा रथ बैल ओढू लागले. त्यानंतर इतरही संतांच्या गावांपासून आषाढी वारीला त्यांची पालखी पंढरीला नेण्याची प्रथा सुरू झाली. अर्थात या पालख्यांचे भोईही बैलच झाले. आजही बैल ओढत असलेल्या रथातील पालख्यांमध्ये पादुकांच्या रुपाने प्रत्यक्ष संतच विराजमान आहेत आणि आपण त्यांच्यासोबत पंढरीची वाट चालत आहोत, अशी वारकऱ्यांची भावना असते. हीच भावना रथ ओढणाऱ्या मुक्या जनावरांचीही असते, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे.

स्वतः संत तुकाराम महाराज शेतकरी जीवन जगत होते. त्यामुळेच
भूतदया गाईपशूचें पालन।
तान्हेल्या जीवन वनामाजी॥
असे शेतकरी आणि त्यांच्या जनावरांमधील भावबंध त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे दरवर्षी वारीच्या निमित्ताने सामाजिक विषयांवर भाष्य करणारे उपक्रम राबविणाऱ्या ‘फेसबुक दिंडी’ने ‘खिल्लार वारी’ ही मोहीम हाती घेतली आहे. ‘खिल्लार महाराष्ट्राची शान’ ही संस्था त्यांना या उपक्रमात साथ देत आहे. देशी (खिल्लार) गोवंशाचे जतन, संवर्धन व्हावे, त्याविषयी लोकजागृती घडून व्हावी हा या मोहिमेमागचा प्रमुख उद्देश आहे, असे ‘फेसबुक दिंडी’चे संस्थापक स्वप्नील मोरे यांनी सांगितले.

या मोहिमेमधून पुढील प्रकारची माहिती दिली जाणार आहे, असे स्वप्नील मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
१. देहू आणि आळंदी पालखी सोहळ्याचे रथ कसा असतो? आणि रथाच्या बैलांची निवड कशी केली जाते?
२. देहूगाव ते पंढरपूर तुकाराम महाराज पालखीचा प्रवास आणि आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वर महाराज पालखीचा प्रवास कसा असतो? किती किलोमीटर, घाट, गावे कोणकोणती? आणि परतीची वारी कशी असते याबद्दल अधिक माहिती.
३. देशी गोवंशापासून ज्यांनी शेतीमध्ये जो आमूलाग्र बदल केला याबद्दल सविस्तर माहितीपट.
४. बैलगाडा शर्यत बंदी उठली याचा कोणता फायदा देशी गोवंशासाठी-खिल्लारसाठी झाला?
५. रथाला जी बैल जोडी असते, त्यांची पूर्ण दिनचर्या कशी असते? सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी पालखी तळावर पोहचेपर्यंत.
६. खिल्लार पालनातून शेतकऱ्यांना कोणता फायदा आहे? हा व्यवसाय ते उत्तमरित्या कसा करू शकतात?
७. देशी गोवंश सांभाळणे किती फायदेशीर आहे? देशी गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाशिवाय, तूप, शेण, गोमूत्र याचे महत्त्व काय आहे?

२०११मध्ये फेसबुक या समाजमाध्यमावर ‘फेसबुक दिंडी’ ही व्हर्च्युअल दिंडी सुरू करण्यात आली. या दिंडीत जगभरातून पाच कोटींहून अधिक वारकरी सहभागी होतात. वारीमधील घडामोडी लोकांपर्यंत पोहचविण्यासोबतच ‘पाणी वाचवा’, ‘पर्यावरण संरक्षण’, ‘महिला सशक्तीकरण’, ‘नेत्रदान’, ‘अवयवदान, ‘वारीतला पोशिंदा’ हे सामाजिक उपक्रमही वारीत राबवले गेले. तसेच वारीचे ‘थीम साँग’ तयार करून त्यातूनही सामाजिक संदेश दिला जात आहे. फेसबुक दिंडीचे यंदा १३ वे वर्ष आहे. आणि ‘सोशल थीम’ अर्थात सामाजिक उपक्रमाचे सहावे वर्ष आहे. ही सहावी थीम ‘खिल्लार वारी’ची असणार आहे. पुढील लिंक्स वापरून सर्वांना या उपक्रमात सहभागी होता येईल.

Facebook: https://www.facebook.com/TukaramMaharajDehu
Instagram: https://www.instagram.com/avirtualdindi/
YouTube: https://www.youtube.com/@facebookdindi
फेसबुक दिंडी च्या WhatsApp समुदायात सहभागी होण्यासाठी या लिंक वर क्लिक करून जॉइन व्हावे-
https://chat.whatsapp.com/GjSvenGXdJ4383XarvGSy0

1 thought on “‘फेसबुक दिंडी’तर्फे यंदा ‘खिल्लार वारी’

  1. फेसबुक दिंडी मुळे प्रत्यक्ष वारीत सहभागी असल्यासारखं होतो. वारीची सर्व माहिती वेळोवेळी मिळत असते. सर्व फेसबुक दिंडीच्या सर्व टीमला खूप खूप धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *